स्वराज्याच्या पहिल्यावहिल्या विजयाचा साक्षीदार - शिरवळचा सुभानमंगळ किल्ला.
शिरवळचे चित्रबेट नावाचे टेकाड होते तिथेच शिरवळचा सुभानमंगळ नाव देऊन सुरवात केलेले हे पहिलेच बांधकाम असेल शके १३९२ विकृतीमान संवत्सरात, म्हणजे इ.स.१४७० साली कोटाचे बांधकाम चालु झाले आधी नामकरण करुन बांधकाम सुरू केलेला हा बहुधा त्या काळातला पहिलाच कोट असावा तब्बल ४५ वर्षे बांधकाम चालून शके १४३७ म्हणजे इ.स.१५१५ साली ते पूर्ण झाले ते काम हैद्राबादच्या निजामाने आपल्या आदिलखान नावाच्या सरदाराला सुभानमंगळ भुईकोट बांधण्याचा हुकुम दिला आणि त्याने हा कोट बांधला कोटात चिवट पांढर्या मातीचे दगड गोट्यात बांधकाम केले त्यामधे महाद्वार, बुरूज, जंबुर्या, दिंडी दरवाजा, लोखंडी अडसर, देवड्या, खंदक,अशी मांडणी करण्यात आली होती तोच हा सुभानमंगळ. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावात शिवरायांनी गनिमीकाव्याचा प्रयोग करून स्वराज्याची स्थापना या शिरवळ येथिल श्री सुभानमंगळ भुईकोट किल्ला हि युध्द भुमी जिंकून करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुभानमंगळ भुईकोट किल्ल्यावर फहतेखानचा सरदार बाळाजी हैबतराव होता यावर आक्रमण करण्याचे ठरवले व यासाठी मावळे तयार झाले गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, भिकाजी चोर, भैरोजी चोर , बाजी पासलकर, कावजी मल्हार, असे मावळ्यांनचा गट सुभानमंगळच्या दिशेने दिनांक ८\८\१६४८ रोजी पहाटे पहाटे पुरंदर वरून रवाना झाला हा किल्ला भुईकोट असल्या कारणामुळे तसी काही अवघड परीस्थिती लढाईची नव्हती पण हा भुईकोट घेण्यासाठी असलेला मुख्य दरवाजा तोडुन सैन्य सहज आत घुसले व फहतेखानच्या सरदाराचे असलेले सैन्य मारले गेले व यात आपले १९२ मावळे धारातीर्थी पडले पण सुभानमंगळचे पहिले गनिमीकाव्याचा वापरकरून केलेले युध्द जिंकले हि आपली प्रत्यक्ष मोगलांच्या बरोबर झालेली पहिली युध्द भुमी आहे आणि हा किल्ला स्वराज्यात युध्द करून सहभागी झालेला पहिला किल्ला. .सातारा जिल्ह्यातल्या शिरवळ गावात नीरा नदीच्या काठावर एक बुरुज इतिहासाच्या आठवणी जपत कित्येक वर्षांपासून एकटाच उभा आहे.किल्ल्याची निशाणी असलेला एकमेव बुरुज आज शिल्लक आहे. बुरुजाजवळ असलेल्या दुर्गा देवीचे मुख पूर्वेला आहे. आपण किल्ल्यावर दुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला दोन वीरगळी पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे.
हा अतिशय दुर्लक्षित दुर्ग म्हणजे किल्ले सुभानमंगळ….!!!!
शिरवळच्या या छोटेखानी गढीवजा भुईकोटावर आदिलशहाचं राज्य होतं आणि या किल्ल्यात त्याचा मिया रहिम मुहम्मद नावाचा सरदार किल्लेदारी सांभाळत होता.
शिवाजीमहाराजांनी १६४८ च्या सुमारास सुभानमंगळ जिंकला. पण पुढे आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या स्वारी दरम्यान त्याने बाळाजी हैबतरावामार्फत पुन्हा सुभानमंगळाचा ताबा मिळवला.
शिवाजी महाराजांनी सुभानमंगळ जिंकण्यासाठी कावजी नावाच्या सरदाराची निवड केली. निवडक सैन्यानिशी कावजीनि सुभानमंगळावर प्रचंड हल्ला चढवला. आदिलशाही सैन्याची काही वेळातच त्याने पुरती दाणादाण उडवली आणि हिंदवी स्वराज्याचा श्रीगणेशा या छोटेखानी ठाण्यावर भगवा फडकावून केला !!!!

No comments:
Post a Comment